Posts

कलेची कलाकारी...आणि कलविकास

 कलेची कलाकारी...आणि कला विकास ..  चित्र,चित्राची दृष्य-भाषा अवगत करून कलावंत,कलाकार घोषित करून वावरणारे असंख्य आहेत.मुळात चित्र,शिल्प का करायचं?कशासाठी आकारायच ? हा एक प्रश्न मनात असतोच.  बालचित्रकला याची सुरुवात मनस्मृतीतून अवगत होत असते.बालमनाच्या अंतर्गत दृष्य लहरींचे पृष्ठभागावर सादरीकरण असते. मनातील आंतरपटलावर  उमटणाऱ्या असंख्य रेघोट्यांतून त्याचे आकाराणे असते.रोज पाहिलेले रंग तो त्या आकारात शोधत रंगव्याप्ती घडवत असतो.हे घराच्या भिंतीवर बालपणी  चितारायच कोण शिकवतय ? कोणीही नाही !  ते त्या बालमनाचे स्पंदन असते.असंख्य आकाराच्या नियोजनात त्याचे मनन चिंतन असते.  शालेय जीवनात काळ/वेळ/विषय/तासिका/शिस्तबद्ध /वर्ग/गट यांच्या सर्व आखणीत अभ्यास,पठण,अनुकरण करत आपल्या अंतर्गत कलागुणांचा विशिष्ट तासिकेत विकास असतो.अभ्यासाबरोबर चिंतन मनन करताना कला आणि कौशल्य या परिभाषेत आत्मसमान ,विकास,मानसिक सौंदर्यातून उदात्त भावनेचा विकास साधला जातो.  कला महाविद्यालय या सर्जन वाटचालीत आपल्या रुचित आपण आपला विकास आणि कला ध्यास साधत अर्थार्जन/महत्वाकांक्षा/मानसिक विकास/समाजभान/कलेतून सहकार्यातून आपण स्वतःला

ससा... कासव…आणि आपण सर्व

  ससा.. कासव...आणि आपण सर्व... सत्ता... विरोध... समाज भान,सामाजिक जबाबदारी,रोजचे जगणे कोणाला चुकले नाही ! सजीव,निर्जीव,संवेदनशील ,भावनिक,राग,लोभ,मोह,मत्सर, मागण्या अधिकार या सर्व सभोवतालात आपले घर,शाळा,कार्यालय,व्यवसाय ,या चक्रात आपला सहभाग असतोच,काळ, वेळ,परिस्थिती सानिध्यात ,संवाद,विसंवादात आपण सर्व नक्की कुठल्या प्रगतीच्या दिशेला चाललोय? देश,प्रदेश,स्वातंत्र्य, स्वायत्तता, या अवस्थेतून जन्म,बालपण,शिक्षण,संगोपन ,स्थैर्य, गरज,निकड,अधिकार,जाणिवा, समज ,देत सहकार,असहकार करताना,व्यवस्थेला,विरोध,आणि सहकार्य करतानाचे,आपले जगणे शोधणे सुरू आहे. सत्ता, निवडणुका, नेता,उमेदवार ,पक्ष,गट,संस्था समूहातून प्रगतीचा आलेख रचताना,सामाजिक संस्कार,परिसर,सानिध्यातून मिळणारे शिक्षण,प्रशिक्षण,स्पर्धा, चढाओढ या सर्व जीवित राहण्याच्या प्रक्रीया आहेत. प्रशिक्षण,आकलन,संवर्धन,वाढणाऱ्या वयातला विकास घडताना एक समाजमन तयार होत असते.आपल्या ज्ञानेंद्रियाच्या संवेदनेत, पाहणे,ऐकणे, स्वाद,गंध ,स्पर्श या अवस्थेतून एक दृष्य संकल्पनेत माणूस नावाचा प्राणी वावरतोय! आपल्या निसर्गात,पंचतत्वात सामील होताना या जीवनचक्रात एक

ईर्षा

  ईर्षा ईर्षा गुप्तपणे वावरत असते... सुप्तपणे सखोल अंतर्गत हालचालीवर दबा धरून.. मूळ आणि कोंब दोन्ही दिशेला पसरताना.. ईर्षा भुसभुशीत मातीतून मार्ग काढत तर कधी खुज्या ठेंगण्या आभाळाला गवासणी घालत वावरते... ईर्षा मतलबी बागडते.. बहरते ओसारते लुप्त होते.. अदृष्य नादात आपल्या वर्चस्वाला शह देत ईर्षा ..आपल्यातचं आपलीचं गां X मारते... राज वसंत शिंगे २५/१२/२०२३

जी... व...आणि न

  [ 1 ] जी...व... आणि.. न.... पहाटे शरीर जागे होतांच मन जागे होते,विचार चक्र,भविष्यातील दिवा स्वप्नांची मालिका सुरू होते.आपल्या अस्तित्वाची आगेकूच करताना,आजच्या दिनक्रमात आपली प्यादी नीट चालवताना आपला विचार आणि संवाद करताना आपला दैनंदिन अभिनय सुरू राहतो. आशा,गरजा,कर्तव्ये, जाणिवा, जबाबदारी,हक्क,अपेक्षा,प्रश्न, प्रतिप्रश्न या जीवित परस्पर नाते/संबंधित/जगणे हा रोजचा व्यवहार असतो. एक जादूगार,कळसूत्री नियतीचा पाठलाग करताना आपले श्वास घेत रमणे असते.चेहरा हा क्षणाक्षणाला बदलत संवादाच्या आंदोलनातून हावभाव,हालचाली,संवेदना लादत/स्विकारत मूक निसर्ग/परिसर,घर/बाहेर, जे जगणे.. म्हणजे दैनंदिन जीवन असते. त्याच्या अथक स्पंदनातून आज/उद्या चे जगणे/वागणे आपण स्वीकारत असतो.आपल्याला भ्रम असतो की हे मी करतोय! करता/ करविता साद/प्रतिसाद देत समज/जाणिवा/अधिकार/हक्क/राग/लोभ/मोह/माया/मत्सर या आंदोलनात आपण जगत असतो..आपला अभिनय सुरू असतो. नशिबी/योगायोग/संपर्क/घडणे/बिघडणे/वागणे/वावरणे/संग यातून समोरचे चित्र ,मंच अवकाशात आकारताना,प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे आपण आपले जीवन रेखाटत आपला जगण्याचा सहभाग असणे.. म्हणजे ज

एक कोरा प्रदेश ...

एक कोरा प्रदेश ... अनवाणी पेन्सिल झिजते आहे ! असंख्य गिरबटत पायवाटा काळ्या रेषांच्या आवर्तनात भाळप्रदेशाच्या प्रस्तुती वेदनेतून ठळक स्त्रावणारे आकार शुभ्र अस्तित्व व्यापत काळेपण समृध्द होत जाणे विलक्षण! कर्ताकरविता ,स्त्रोत,उगम,अंत,अनंत धुंडाळण्यापेक्षा एकमेकांच्या स्पर्शाच्या आरोह अवरोहात आवेगात, गुंतून घेत तृप्त व्हायचं ! आतला बंदिस्त शिसंं-नाद टोकदार,बोथड,तासता तासता शकलं, आवरणे गळून पडतात काळा गाभा झिजताना नियतीच्या घट्ट आवरणात बोटांच्या स्पर्शनादात घर्षणाच्या,आलिंगनात स्पर्शभाषेतून मौन-मुक्त होत साकारायचं आकार,निराकार ,अर्थ,बोध, शोधत राहायचं विचार,प्रवाह,मन,संवेदना,साद, प्रतिसादात पेन्सिल पराधिन असते गिरगिटता,तासता-तासता गुलाम असते ! पेन्सिल तिचे अस्तित्व साकारणारी बोटे मनाची कवाडे आरिला वेसण घालून दौडवता दौवडता पेन्सिल खुजी होते ! आस्तित्वहिन होत जाते ! मूक असते! पेन्सिल.. राज वसंत शिंगे १८/५/२०२३

Beautiful Thailand ...

Image

Funeral ..Lanna Community ..Chiang mai -Thailand

Image