एक कोरा प्रदेश ...
एक कोरा प्रदेश ... अनवाणी पेन्सिल झिजते आहे ! असंख्य गिरबटत पायवाटा काळ्या रेषांच्या आवर्तनात भाळप्रदेशाच्या प्रस्तुती वेदनेतून ठळक स्त्रावणारे आकार शुभ्र अस्तित्व व्यापत काळेपण समृध्द होत जाणे विलक्षण! कर्ताकरविता ,स्त्रोत,उगम,अंत,अनंत धुंडाळण्यापेक्षा एकमेकांच्या स्पर्शाच्या आरोह अवरोहात आवेगात, गुंतून घेत तृप्त व्हायचं ! आतला बंदिस्त शिसंं-नाद टोकदार,बोथड,तासता तासता शकलं, आवरणे गळून पडतात काळा गाभा झिजताना नियतीच्या घट्ट आवरणात बोटांच्या स्पर्शनादात घर्षणाच्या,आलिंगनात स्पर्शभाषेतून मौन-मुक्त होत साकारायचं आकार,निराकार ,अर्थ,बोध, शोधत राहायचं विचार,प्रवाह,मन,संवेदना,साद, प्रतिसादात पेन्सिल पराधिन असते गिरगिटता,तासता-तासता गुलाम असते ! पेन्सिल तिचे अस्तित्व साकारणारी बोटे मनाची कवाडे आरिला वेसण घालून दौडवता दौवडता पेन्सिल खुजी होते ! आस्तित्वहिन होत जाते ! मूक असते! पेन्सिल.. राज वसंत शिंगे १८/५/२०२३