कलेची कलाकारी...आणि कलविकास
कलेची कलाकारी...आणि कला विकास .. चित्र,चित्राची दृष्य-भाषा अवगत करून कलावंत,कलाकार घोषित करून वावरणारे असंख्य आहेत.मुळात चित्र,शिल्प का करायचं?कशासाठी आकारायच ? हा एक प्रश्न मनात असतोच. बालचित्रकला याची सुरुवात मनस्मृतीतून अवगत होत असते.बालमनाच्या अंतर्गत दृष्य लहरींचे पृष्ठभागावर सादरीकरण असते. मनातील आंतरपटलावर उमटणाऱ्या असंख्य रेघोट्यांतून त्याचे आकाराणे असते.रोज पाहिलेले रंग तो त्या आकारात शोधत रंगव्याप्ती घडवत असतो.हे घराच्या भिंतीवर बालपणी चितारायच कोण शिकवतय ? कोणीही नाही ! ते त्या बालमनाचे स्पंदन असते.असंख्य आकाराच्या नियोजनात त्याचे मनन चिंतन असते. शालेय जीवनात काळ/वेळ/विषय/तासिका/शिस्तबद्ध /वर्ग/गट यांच्या सर्व आखणीत अभ्यास,पठण,अनुकरण करत आपल्या अंतर्गत कलागुणांचा विशिष्ट तासिकेत विकास असतो.अभ्यासाबरोबर चिंतन मनन करताना कला आणि कौशल्य या परिभाषेत आत्मसमान ,विकास,मानसिक सौंदर्यातून उदात्त भावनेचा विकास साधला जातो. कला महाविद्यालय या सर्जन वाटचालीत आपल्या रुचित आपण आपला विकास आणि कला ध्यास साधत अर्थार्जन/महत्वाकांक्षा/मानसिक विकास/...