ईर्षा
ईर्षा
ईर्षा गुप्तपणे
वावरत असते...
सुप्तपणे
सखोल
अंतर्गत हालचालीवर
दबा धरून..
मूळ आणि कोंब
दोन्ही दिशेला
पसरताना..
ईर्षा
भुसभुशीत
मातीतून
मार्ग काढत
तर कधी
खुज्या
ठेंगण्या
आभाळाला गवासणी घालत
वावरते...
ईर्षा
मतलबी
बागडते..
बहरते
ओसारते
लुप्त होते..
अदृष्य नादात
आपल्या
वर्चस्वाला शह देत
ईर्षा ..आपल्यातचं
आपलीचं
गां X
मारते...
राज वसंत शिंगे
२५/१२/२०२३
Comments
Post a Comment