जी... व...आणि न

 [ 1 ]


जी...व... आणि.. न....

पहाटे शरीर जागे होतांच मन जागे होते,विचार चक्र,भविष्यातील दिवा स्वप्नांची मालिका सुरू होते.आपल्या अस्तित्वाची आगेकूच करताना,आजच्या दिनक्रमात आपली प्यादी नीट चालवताना आपला विचार आणि संवाद करताना आपला दैनंदिन अभिनय सुरू राहतो.

आशा,गरजा,कर्तव्ये, जाणिवा, जबाबदारी,हक्क,अपेक्षा,प्रश्न,
प्रतिप्रश्न या जीवित परस्पर नाते/संबंधित/जगणे हा रोजचा व्यवहार असतो.

एक जादूगार,कळसूत्री नियतीचा पाठलाग करताना आपले श्वास घेत रमणे असते.चेहरा हा क्षणाक्षणाला बदलत संवादाच्या आंदोलनातून हावभाव,हालचाली,संवेदना लादत/स्विकारत मूक निसर्ग/परिसर,घर/बाहेर, जे जगणे.. म्हणजे दैनंदिन जीवन असते.

त्याच्या अथक स्पंदनातून आज/उद्या चे जगणे/वागणे आपण स्वीकारत असतो.आपल्याला भ्रम असतो की हे मी करतोय!

करता/ करविता साद/प्रतिसाद देत समज/जाणिवा/अधिकार/हक्क/राग/लोभ/मोह/माया/मत्सर या आंदोलनात आपण जगत असतो..आपला अभिनय सुरू असतो.

नशिबी/योगायोग/संपर्क/घडणे/बिघडणे/वागणे/वावरणे/संग यातून समोरचे चित्र ,मंच अवकाशात आकारताना,प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे आपण आपले जीवन रेखाटत आपला जगण्याचा सहभाग असणे.. म्हणजे जिवंत राहणे/स्वतःला जीवित मान्य करीत मृत्यूपर्यंत आपापला प्रवास असतो.

राज वसंत शिंगे
२४/१२/२०२३


Comments

Popular posts from this blog

ईर्षा

कलेची कलाकारी...आणि कलविकास