मंगल दिन हा आला भाग्याचा ....आला सौख्याचा ...या तेजोमय दिवसाची चाहुल लागताच ...मन प्रसन्न होते .
एक नवा विचार ..नवा प्रवाह ...खरेदी ..विक्री ..देण्या..घेण्याचा आनन्द   ...प्रत्येकाची दिवाळी...गरीब ..श्रीमंत ..
लहान ..थोर ...सर्वांचा..एकच आनन्द ...राग लोभ ...दुख विसरत ...पुढे सरकताना ...हा जगण्याचा प्रवास सुरु असतो ...कोणी तरी कोणासाठी तरी .. जगत असतो ...मोह..स्वार्थ ...आपले पण जपताना ...नक्की आपण  ...काय का करतो.. ..कशासाठी जगतो ...याचे भान राखतो का ?..आज या आनंदात ...समाजाचे थोड़े भान असणे
जरुरीचे वाटते ..पर्यावरण ...घन कचरा ...ध्वनि प्रदुषण ....या सगळ्या गोष्टी चा विचार या आनंदात असायला हवा ..भरपूर नवे कपडे ....खरेदीला  उधाण...खाण्याची मौज मजा ...या मधून वेळ काढून ज्यांच्या जवळ काही नाही...त्याना जर वेळ देऊन ...आर्थिक मदत करू शकलो ...तर त्याच्या  सारखा आनन्द नाही ...या जगण्यात ..
आज भर रस्त्यात फटाक्याची.भली मोठी माळ लाउन...कचरा करणारे महाभाग ..आहेत ..समोरच्या घरात फटाका फेकत..आनन्द घेणारे खुप भेटतील ...रस्त्या रस्त्यावर ...सावधान ..सगळे बदलत चालले आहे...डोळे झाक..करू नका ....तोंड बंद ठेवून पळ काढू नका ....कानावर हात ठेउन ...जगु नका ...

Comments

Popular posts from this blog

ईर्षा

जी... व...आणि न

कलेची कलाकारी...आणि कलविकास